आनंदा धुमाळ यांचे दुःख निधन
—————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
वागदरी तालुका तुळजापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सदन शेतकरी आनंदा तुळशीराम धुमाळ उर्फ आनंदा भाऊ यांचे दि.१५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.०० वा. दरम्यान दुःखद निधन झाले आहे.
कै.आनंदा भाऊ हे शेती व्यवसायात पारंगत होते. आपला शेती व्यवसाय सांभाळत ते राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होते.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नळदुर्ग चे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी काही काळ शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व केले. दरम्यानच्या काळात शेती व्यवसायात अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला शेती विषयक कर्ज मिळवून देणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, असे कार्य त्यांचे अविरतपणे चालू होते.एकंदरीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे साथीदार म्हणून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यात त्यांचा मोठा हात खंड होता.शेती व्यवसायावर त्यांची खुप निष्ठा होती.शेतात कष्टाची कामे करत करत त्यांनी आपल्या मुलामुलींना शिक्षण देवून त्यांचा संसार उभा केला. दि.१५ एप्रिल २o२६ रोजी रात्री ११.०० वा. अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय ७५वर्षे होते.वागदरी येथेच त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना जावाई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या दुःखद निधना बद्दल जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापती सिध्देश्वर आण्णा कोरे, प.स. सदस्य भिवाजी इंगोले,नळदुर्ग न.प.चे नगर सेवक तथा गट नेते मारूती खारवे,रामतिर्थचे माजी सरपंच दामाजी राठोड, बोरगावचे माजी सरपंच मोहन माने सर सह उपस्थित सर्व शोकाकूल जन समुदायानी त्याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.






