सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण!
नगरपालिका आणि समंधित प्रशासनास वेळोवेळी निवेदन सादर !
तुळजापूर प्रतिनिधी : – येथील वेताळ नगर भागातील नियोजित श्री संत सेना महाराज सांस्कृतिक संभागृह बांधकाम सुरु असून तेथील जागेवर अतिक्रमण वाढ झालेलं दिसून आले असल्यामुळे ते हटवण्यात यावं या मागणीसाठी सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
नाभिक समाज हा तुळजापूर क्षेत्रात आपले दैनंदिन सेवाकार्य करीत असून समाजाचे थोर संत श्री सेना महाराज यांची प्रतिवर्षी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात. श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी सकल नाभिक सामाजाचे सांस्कृतिक सभागृह व्हावे यासाठी मागील चाळीस वर्षापासुन
नगरपालिका प्रशासनाकडे विनंती निवेदनाद्वारे सातत्याने मागणी करत असून नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी या विषयी सकारात्मक प्रतिसाद देत आमदार राणाजगजितसिंह यांच्याकडे पाठपुरावा करून श्री संत सेना महाराज सांस्कृतिक संभागृहसाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या जागी बांधकाम देखील सुरु झाले आहे. पण जी निश्चित जागा असायला हवी होती ती शेजारील राहिवाशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले आहे. ते अतिक्रमण आता काढून नियोजीत बांधकामासाठी रिक्त करून द्यावी या एकच विधायक मागणीसाठी सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या लाक्षणिक उपोषणास तुळजापूर शहरातील सर्व नाभिक बांधवानी एक दिवस सलून दुकान बंद ठेवत या अतिक्रमण बाबत निषेध व्यक्त केला आहे.मोठ्या संख्येने नाभिक व्यावसायिक या उपोषणात सहभागी झालेले दिसून आले.
सकल नाभिक समाज तुळजापूर







