जि. प. प्राथमिक शाळा भिमनगर स्पेशल नळदुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
————————————–
————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पेशल नळदुर्ग भिमनगर येथे आभिवादनाच्या कार्यक्रम आयोजित करून विविध उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर इंग्रजी व मराठी भाषेतून भाषणे केली..
महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग येथील बौद्धाचार्य तथा संपादक दादासाहेब बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी योग्य दिशेने कशी वाटचाल करावी हे सांगितले.
तर येथील सहशिक्षिका श्रीमती टिळक सुलक्षणा मॅडम यांनी मुलांसाठी शालेय वस्तूमध्ये एक रजिस्टर, एक पेन, एक चित्रकला वही, कंपास बॉक्स, इंग्रजी रिडर वाटप केले तसेच चिवडा लाडू पेढे खाऊचे वाटप केले.
शाळेत मुख्यमंत्री योजनेतील माजी प्रशिक्षणार्थी प्रेरणा सुरवसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व उपस्थितांसाठी खीर दान केले व शाळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एक प्रतिमा भेट दिली.
शाळेतील कार्यरत शिक्षीका टिळक सुलक्षणा मॅडम ह्यांच्या परिवारातील शैलेश शिलवंत,श्वेत शिलवंत शालवी शिलवंत आदी सहकुटुंब शाळेत उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.







