भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दलाकडून सलामी देऊन अभिवादन उमरगा शहरात समता सैनिक दलाचे पथसंचलन .
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव दि. १६ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाची सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ५० प्रश्न तयार करण्यात आले होते, या स्पर्धा परीक्षेमध्ये पेठ सांगवी, कसगी, आळंगा, भुसणी, या गावांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम विजेत्या सविता कांबळे, द्वितीय हर्ष प्रिया कांबळे, तृतीय दीक्षांत गायकवाड या तिघांचा क्रमांक आला असून यांना जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिग्विजय शिंदे, भारतीय बौद्ध महासभेची तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, सरचिटणीस संगीता कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर दुपारी १२वाजता पोलीस प्रशासनाच्या परवान्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद येथून समता सैनिक दलाच्या पथ संचलनास सुरुवात करण्यात आली. या पथसंचालनामध्ये बेट जवळगा, पेठसागवी,कलदेव लिंबाळा, एकुर्गा, तुरोरी, ऐकुडी, कसगी, भुसणी, आळंगा आदी गावातील समता सैनिकांनी या पथसंचलणामध्ये सहभाग घेतला होता. भारतीय बौद्ध महासभेच्या आदेशाप्रमाणे दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. तसेच दिनांक १२ एप्रिल रोजी १८ तास अभ्यास घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. दिनांक १३ एप्रिल रोजी तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिनांक १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी अभिवादन करण्यात आले. दुपारी बारानंतर समता सैनिक दलाचे पतंजलना सुरुवात करण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद ते बस स्थानक उमरगा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पथसंचलनाचे समारोप करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, संगीता सोनकांबळे, सोनाली कांबळे, रेखा कांबळे, सुरेखा कांबळे, आशा कांबळे, तातेराव मादळे, शिवाजी जाधव, आनंद कांबळे, कुंभारी गायकवाड, संता सैनिक दलाचे सर्व ७२ समता सैनिक या पथसचलनामध्ये सहभागी झाले होते. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद ते बस स्थानक उमरगा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड, सर्व तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद येथे पथ संचलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी उमरगा तालुक्यातील सर्व समता सैनिक दलाचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेची पदाधिकारी शाखा भुसणी, नाईचाकूर, पेठसागवी, मातोळा, कसगी, कदेर, औराद, एकुर्गा भेट जवळगा येथील शाखा पदाधिकारी या जयंती महोत्सवासाठी उपस्थित होते तर समता सैनिक दलाच्या अलका माने, चित्रा कांबळे, किरण काबळे,मंगलबाई गायकवाड, नागिनी गायकवाड, सुज्ञान कांबळे, सुरेखा कांबळे, रुक्मिणी गायकवाड, वंदना गायकवाड, भारतबाई गायकवाड, सविता गायकवाड, अनिता गायकवाड, सुवर्णा सुरवसे, अनुसया झाकडे, मंगल झाकडे लखन कांबळे, रानुबाई भरले, मकुबाई कांबळे, केसराबाई धने राव, मंगल गायकवाड, महादेवी गायकवाड, मैनाबाई कांबळे, झुंबर गायकवाड, श्रीदेवी गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, गायत्री गायकवाड, द्रौपदी सूर्यवंशी, आशा कांबळे, सुशा कांबळे, पमा बाई हंताळकर, रेशमा गायकवाड, सोनाली कांबळे, अनिता कांबळे, सुनंदा सुरवसे, तुळसाबाई गायकवाड, वैजंता कांबळे, प्रजापती सोनकांबळे, बौद्ध उपासिका अंगुलमाला सुरवसे, सुनंदा सागर कांबळे, प्रियंका सावंत, बौध्द उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.







