Best News Portal Development Company In India

सलगरा (मड्डी ) येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ची भव्य मिरवणुकीने सांगता !

सलगरा (मड्डी ) येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ची भव्य मिरवणुकीने सांगता
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली असून दिनांक १६ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब . आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सलगरा मड्डी च्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक.७.oo वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून संघमित्र गायन कलापथक हडपसर पुणे यांच्या समाज प्रबोधनपर भिम गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी संघमित्र गायन कलापथकाचे प्रदीप वाघमारे,दयानंद गायकवाड,चंद्रकांत शिंदे,प्रेमचंद कांबळे,किरण कांबळे,अतुल वाघमारे, अंबादास वाघमारे,गणेश बनसोडे,निलेश वाघमारे,आदी कलावंतांनी समाजप्रबोधनपर अर्थपूर्ण भिम गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
तर दिनांक १६ एप्रिल २o२६ रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान येथील भीम नगर येथून भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सहवाद्या लेझीम पथकासह गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भीम सेना लेझीम पथक नंदगाव,धम्मदीप लेझीम संघ अचलेर,कमलशील लेझीम पथक हंगरगा नळ,भीम टायगर लेझीम पथक भुरीकवठा आधी लेझीम पथकाने गावातील मुख्य चौका चौकात आपल्या लेझीम पथकाचा उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले.
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे दिगंबर वाघमारे,दीपक वाघमारे, अण्णाप्पा वाघमारे,सुदर्शन वाघमारे,मीनाक्षी वाघमारे, तात्याराव वाघमारे, चंद्रकांत वाघमारे,गुंडू वाघमारे,गजेंद्र वाघमारे,भालचंद्र वाघमारे, गोरख वाघमारे,विजय गायकवाड,शुक्राचार्य वाघमारे, भरत वाघमारे,सतीश वाघमारे, रवी वाघमारे,सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india