Best News Portal Development Company In India

जी.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरी !

जी.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरी
——————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी तालुका तुळजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे मुख्याध्यापक बी.बी.सगर यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सामुदायिक रित्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तसेच शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यावेळी पाहुणे म्हणून बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस.के. गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून किमान आठ तास अभ्यास करून आपला सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी सहशिक्षक तानाजी लोहार, काळे सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,ग्रामप्र सदस्य मीनाक्षीताई बिराजदार सुरेखाताई यादव मुक्ताबाई बिराजदार अंगणवाडी कार्यकर्त्या पद्मिनी ताई पवार मदतनीस रूपाली जाधव अशा कार्यकर्ते पार्वती बाई बिराजदार ज्येष्ठ कार्यकर्ते कुंडलिक वाघमारे ग्रामपंचायत कर्मचारी सर्जेराव चव्हाण सह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india