Best News Portal Development Company In India

तालुक्यातील त्रिकोळी येथील शेख जिंदावली ऊरुसानिमित्त शुक्रवारी दि.१७ रोजी जंगी कुस्त्या पार पडल्या !

तलमोड आनंद सुर्यवंशी.
तालुक्यातील त्रिकोळी येथील शेख जिंदावली ऊरुसानिमित्त शुक्रवारी दि.१७ रोजी जंगी कुस्त्या पार पडल्या. अंतिम कुस्ती अक्कलकोटच्या विकास बनसोडे व वाडी वडगावच्या जीवन माळी यांच्यात होऊन कुस्तीचा निकाल न लागल्याने बरोबरीत सोडवावी लागली .
हिंदू मुस्लीन ऐक्याचे प्रतिक असलेल्या शेख जिंदावलीची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली. हजारो भाविक यात्रेला आले होते . त्यामुळे या यात्रेकडे ऐक्याच्या भावनेतून पाहिले जाते .
त्रिकोळी येथील कुस्त्याला अनेक वर्षापासूनची  परंपरा असून या कुस्तीच्या फडात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मल्लानी हजेरी लावली आहे. दुपारी साडेतीन वाजता कुस्त्याला प्रारंभ झाला. या फडात जवळपास सव्वाशे कुस्त्या पार पडल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या पार पडल्या. लहान मुलांच्या अनेक कुस्त्या लक्षवेधी झाल्या. तदनंतर मोठया कुस्त्याला सुरुवात झाली. कुन्हाळीच्या पंकज मुळजे व आकाश चोपडे यांच्यातील लढत लक्षवेधी झाली. तसेच सतीश नरवटे व अमर माने यांच्यातील जोरदार लढत होऊन सतीश नरवटे यांनी एकेरी पट काढत लढत जिंकली. अंतिम लढत अक्कलकोटचा विकास बनसोडे व वाडी वडगावचा जीवन माळी यांच्यात झाली २१ हजार रुपये व चांदीची गदा शर्यत असलेली ही कुस्ती पाऊण तासाच्या झुंजींनंतर बरोबरीत काढावी लागली. सुरुवातीला दोन्ही पैलवांनानी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत डावावर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न केले तरी कुस्तीचा निकाल लागला नाही. शेवटी पंचांनी दोन्ही पैलवानाला अतिरिक्त दहा मिनिटाचा वेळ दिला परंतू कुस्ती होऊ शकली नाही. शेवटी पंचांनी कुस्ती बरोबरीत काढली. दोन्ही पैलवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सर्व कुस्तीच्या सामन्यासाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच सुंदर जवळगे, बळीराम मारेकर, शाहूराज हासूरे, पप्पू काळे, ऍड.उद्धव भोसले, विकास पाटील आदिनी काम पाहिले.
कुस्तीच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक कुन्हाळे, उपाध्यक्ष शरद कोडगीर, उपसरपंच शिवाजी सुरवसे, सदस्य हणमंत वाडीकर, हरिदास सुरवसे, पांडुरंग सांगवे, जहांगीर मुल्ला पंचायत समिती सदस्य रविंद्र हंगरगे, दत्तात्रय वाडीकर, भीमराव पाटील, महादेव भोसले, दयानंद पाटील, विजयकुमार कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india