धक्कादायक! मृत अर्भकाची कचऱ्याच्या बॅगेत विल्हेवाट; आईविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर | प्रतिनिधी-
जिल्हा स्त्री रुग्णालयातील एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, जन्मजात मृत झालेल्या स्त्री जातीच्या अर्भकाची अत्यंत अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याप्रकरणी एका महिलेवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सुनिता प्रज्योत उंदरे (वय ४०, रा. वाशी, जि. धाराशिव) हिची दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे प्रसूती झाली होती. यावेळी तिने एका मृत मुलीला जन्म दिला. नियमानुसार, अशा परिस्थितीत मृत अर्भकावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे अपेक्षित होते.
मात्र, आरोपी महिलेने अपत्य जन्माची माहिती लपवण्याच्या उद्देशाने किंवा बेजबाबदारपणाने मृत अर्भकाला कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या पॉलिथीन बॅगमध्ये भरले आणि त्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान लक्ष्मण आगरकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून १७ एप्रिल २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी सुनिता उंदरे हिच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ९४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत अर्भकाची विल्हेवाट लावताना मानवी सन्मानाला तिलांजली दिल्याने कायद्यानुसार ही गंभीर बाब मानली गेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





