तुळजापूर पोलीस ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद; मृत महिलेची ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन !
तुळजापूर: प्रतिनिधी-
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात अपघाती अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित महिलेच्या वारसांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अनोळखी महिला (वय अंदाजे ६५ वर्षे) ही एका अपघातात जखमी झाली होती. तिला दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी १०८ रुग्णवाहिकेमार्फत प्रथम तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सरकारी दवाखाना, धाराशिव येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १५:२४ वाजता या महिलेचा मृत्यू झाला.
पोलीस कार्यवाही:
या घटनेबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात आ.मृ. नंबर ०१/२०२६, कलम १९४ भा.ना.सु.सं. अन्वये नोंद करण्यात आली आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.
संपर्क साधण्याचे आवाहन तुळजापूर पोलीस ठाण्याचे आवाहन.
सदर वर्णन असलेल्या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास किंवा तिचे नातेवाईक आढळल्यास त्वरित ९६०७९९८७१५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तुळजापूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्वांनी सतर्क राहून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून वृत्त व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत माहिती मिळेल. जरी कुणाचे नातेवाईक मिसिंग असतील तर त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा.





