गणेश नगर येथे सीएनजी पंपाचे भूमिपूजन बापूराव पाटील यांच्या हस्ते…
पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि वाहनधारकांची सोय करण्यासाठी…
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि वाहनधारकांची सोय करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्त आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेश नगर, ता. उमरगा येथे रविवारी (दि. १९) रोजी नूतन सीएनजी पंपाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सीएनजी पंपाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि कुदळ मारून करण्यात आले. यावेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक गणेश अंबर, अमर भोसले, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी, धनराज मंगरुळे, रशीद शेख, गोविंद पाटील, बसवराज पाटील, उल्हास घुरघुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. हा पंप केवळ एक व्यवसाय नसून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. पर्यावरणापूरक पाऊल, वाहनधारकांना दिलासा, सीएनजीमुळे प्रदूषणात घट, नागरिकांना स्वस्त इंधन उपलब्ध होईल. या पंपाच्या सुविधेमुळे आता स्थानिक वाहनधारकांना इंधनासाठी लांबवर जाण्याची गरज भासणार नाही. या परिसरातील नागरिकांनी या नवीन सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
फोटो ओळ : मुरूम,ता. उमरगा येथील गणेश नगर भागात सीएनजी पंपाच्या उद्घाटन प्रसंगी भूमिपूजन बापूराव पाटील करताना शरण पाटील, रमेश चव्हाण, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी, धनराज मंगरुळे आदि उपस्थित होते.






