Best News Portal Development Company In India

सिंदगाव येथे विधवा, निराधार, परित्यक्ता, एकल महिलांची सह विचार सभा संपन्न !

सिंदगाव येथे विधवा, निराधार, परित्यक्ता, एकल महिलांची सह विचार सभा संपन्न
————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड )
परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव/नळदुर्ग ता.तुळजापूर अंतर्गत साऊ महिला संघटनेचे वतीने शिंदगाव ता.तुळजापूर येथे विधवा,निराधार,परित्यक्ता, एकल महिलांची सहविचार सभा घेण्यात आली.यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव तथा मिशन वात्सल्य समिती तुळजापूर चे अशासकीय सदस्य मारुती बनसोडे यांनी या महिलाना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली गावातील महिलांच्या विविध समस्या समजून घेतल्या.यात २० महिला उपस्थित होत्या.त्या पैकी चार महिलाना घरकुल मिळाले नाही. दोन महिलांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळत होता तो अचानक बंद झाला आहे.एक घटस्फोटीत महिला आहे तिला ५ ववर्षाचा मुलगा आहे कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही अशा अनेक समस्या या सभेतील चर्चेतून समोर आल्या आहेत.
या प्रसंगी मारूती बनसोडे पुढे बोलताना म्हणाले की शासन विधवा,परितक्ता,घटस्फोटीत एकल महिलासाठी,पूर्ण अनाथ, अर्ध अनाथ मुला मुलीसाठी अनेक योजना राबवित आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलानी पुढे आले पाहिजे.
महाराष्ट्रात हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एकल महिला संघटना काम करीत आहे तर धाराशिव जिल्ह्यात विजय काका जाधव व मारुती बनसोडे कोरोना कालावधीपासून या प्रश्नावर काम करीत आहे तरी गरजू महिलांनी त्यांच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कमल पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी एकल महिला सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india