Best News Portal Development Company In India

शिव -बसव प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

शिव -बसव प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा शहरात अंतूबळी पतंगे सभागृह नियोजित महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरामध्ये जयंती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी लिंगायत समाज संस्था अध्यक्ष डॉ मल्लिनाथ मलंग, सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे, बाबा मस्के, एम ओ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती सोहळा मोठ्या भक्ती भावाने उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रवीण माशाळकर, राजशेखर आरबळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष बाबा औटी, करण पाटील, बालाजी कुडूबले, प्रदीप गिरीबा, शिवकांत पतगे, करण पाटील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव- बसव प्रतिष्ठानचे दिनेश बिराजदार, प्रवीण पाटील, दीपक येळापुरे, गिरीश अष्टगे, सुमित दंडगे, अभय अष्टगे,अमर माळी, सचिन पाटील, रितेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india