Best News Portal Development Company In India

दहावी सीबीएसई परीक्षेत यश; लीड स्कूलकडून अनार्याचा गौरव ! अविनाश जोशी /करमाळा .

दहावी सीबीएसई परीक्षेत यश;
लीड स्कूलकडून अनार्याचा गौरव
अविनाश जोशी /करमाळा
करमाळा- दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल, लीड स्कूलची विद्यार्थिनी
अनार्या कांबळे हिचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल शाळेत उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सत्कार समारंभात प्राचार्या कामिनी जोशी यांच्या हस्ते अनार्याला गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्या जोशी म्हणाल्या की, अनार्याने मिळवलेले हे यश संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद आहे. तिने आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शाळेचे नाव उंचावले आहे.

सत्काराला उत्तर देताना अनार्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या पालकांसह शाळेतील अभ्यासू वातावरण आणि शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला जाते. शिक्षकांनी प्रत्येक वेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हा यशाचा टप्पा गाठू शकले.

या गौरव सोहळ्याला वर्गशिक्षक शिवाजीराव दळवी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल अनार्याचे आणि तिच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india