Best News Portal Development Company In India

आगज्याप्पा देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त काल्याचे किर्तन, पालखीची मिरवणूक सोहळा संपन्न… उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव!

आगज्याप्पा देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त काल्याचे किर्तन, पालखीची मिरवणूक सोहळा संपन्न…
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील कराळी येथील श्री क्षेत्र आगज्याप्पा देवस्थान अग्निबेट येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा सोहळा संपन्न झाली. दि. १२एप्रिलपासून आठवडाभर चालणाऱ्या हरिनामा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली होती त्याची सांगता नुकतीच झाली आहे.

या सप्ताह सोहळ्यात कीर्तन, भजन, भागवत कथा तसेच श्रीकृष्ण लीला कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन आणि विवीध कार्यक्रम यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने कसे जगावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी या सप्ताहानिमित्त श्री क्षेत्र अगज्याप्पा देवस्थान अग्निबेट कराळी येथून सर्व गावांमध्ये नगर प्रदक्षिणा पालखी मिरवणूक काढण्यात आली. हनुमान मंदिरापासून पारंपरिक पालखी काढण्यात आली आणि तसेच अग्निबेट देवस्थानचे मठाधिपती महंत तेजसनाथ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी महंत तेजसनाथ महाराजांनी सर्व भक्तांना श्रीकृष्ण लीला सांगितल्या, तसेच माणसाच्या जीवनामध्ये नामजपाचे महत्त्व, जगण्याचे महत्त्व याबद्दल कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना प्रबोधन केले. तसेच महंत तेजसनाथ महाराज यांच्या हस्ते काला व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कराळी परिसरातील व सर्व पंचक्रोशीतील आणि आसपासच्या गावातील भक्तांनी या अखंड हरिनामा सप्ताहात आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथेत सहभाग घेतला होता. यावेळी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथील भजनकरी मंडळी व श्री क्षेत्र आगजाप्पा देवस्थान भजनकरी मंडळी तसेच हनुमान मंदिर भजनकरी मंडळी, सर्व महिला भजनी मंडळ उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व गावकरी आणि श्री क्षेत्र आगज्यापा देवस्थान कमिटी, सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल्याच्या दिवशी सांगता सोहळ्यात श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथील हभप. हरी गुरूजी लवटे महाराज व हभप. सिद्धयोगी ब्रह्मनंद गिरी महाराज चिचकोट मठ, हभप. ज्ञानेश्वर बरमदे महाराज हासोरी,
हभप. सत्यवान महाराज इंगळे, हभप. दामोदर महाराज मुगळे, हभप. ज्ञानेश्वर येवते, हभप. कृष्णा जाजनूरकर, हभप. ज्ञानेश्वर जगताप व्हंताळ, हभप. तुकाराम माने मोरखंडी, हभप. जयपाल ढगे गुरूजी, हभप. रेणके गुरूजी, हभप. नागोराव तरमुडे, हभप. दामु महाराज जगदाळवाडी यांची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india