तलमोड प्रशालेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..
तलमोड आनंद सुर्यवंशी.
उमरगा तालुक्यातील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड प्रशालेत महान महात्मा, जगद्ज्योती, लिंगायत धर्म संस्थापक, दलितांचे भाग्यविधाते संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विराज मोरे यांच्या हस्ते प्रतीमा पूजन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. त्यांनी समता, बंधुता आणि लोकशाहीचे विचार मांडले. महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती संपूर्ण दक्षिण भारतात, प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात साजरी केली जाते.
बसवण्णा यांचा जातीव्यवस्थेपासून मुक्त आणि सर्वांना समान संधी असलेल्या समाजावर विश्वास होता. महात्मा बसवेश्वर महाराज यांनी दलितानाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्व मानव समान आहेत आणि सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. जी एक अशी अकादमी होती, ज्यात लिंगायत गूढवादी, संत आणि तत्त्वज्ञांचा समावेश होता. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि लिंगायत धर्म होण्यासाठी खूप मोठा लढा उभारला होता.
महात्मा जगद्ज्योती बसवेश्वर महाराज यांचं कार्य खूप मोठं आहे. अशा या थोर, तेजस्वी महात्म्यास जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.





