Best News Portal Development Company In India

उमरगा तालुक्यातील दगडधानोरा येथील वेदांत महावीर जाधव या मुलांची सैनिकी स्कूल चंद्रपूर येथे निवड ! तुरोरी दमयंती भालेराव.

उमरगा तालुक्यातील दगडधानोरा येथील वेदांत महावीर जाधव या मुलांची सैनिकी स्कूल चंद्रपूर येथे निवड !
तुरोरी दमयंती भालेराव.

तालुक्यातील दगड धानोरा येथील रहिवाशी असलेले व सध्या शिक्षणासाठी पुणे औंध येथे वास्तव्यास असलेले जाधव कुटुंबातील सदस्य कु. वेदांत महावीर जाधव याने All India Sainiki school Exam मध्ये आपले घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने 400 पैकी 334 मार्क्स घेऊन यश संपादन केलेलं आहे व सैनिकी स्कूल चंद्रपूर येथे निवड झाली .”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ” जो शिकेल तोच टिकेल ही मन सार्थ ठरवत अत्यंत कष्टातून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने कुमार वेदांत महावीर जाधव या विद्यार्थ्याने हे यश आपल्या पदरी पाडून घेतले आहे. त्याच्या या यशामध्ये त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक आणि इतर सहकारी त्यांच्ये मोलाचे योगदान त्याला लाभले आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य असे काहीच नसते हे या विद्यार्थ्याने दाखवून दिले.
त्यानिमित्त धानोरा गावातील सर्व गावकरी मंडळी आणि आजोबा माणिकराव जाधव आजी लोचनाबाई जाधव ,काका विठ्ठल आणि स्वाती जाधव,सुधीर आणि पल्लवी जाधव ,अमोल जाधव,पद्माकर घोगे, समाधान भोसले, मामा, यशवंत शेळके,सचिन शिंदे आणि नितीन दाबके व तसेच सह्याद्री मित्र संस्था उमरगा यांनी या मुलांसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india