Best News Portal Development Company In India

नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावर डल्ला! सव्वा लाखाचे विद्युत साहित्य लंपास !

नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावर डल्ला! सव्वा लाखाचे विद्युत साहित्य लंपास !
तुळजापूर (प्रतिनिधी): चोरट्यांची वाढती दहशत ऐतिहासिक नळदुर्ग येथील बुरुज क्रमांक १ वरून अज्ञात चोरट्यांनी सप्लाय केबल आणि पॅनेल बोर्डमधील तांब्याच्या तारांसह महागड्या साहित्याची चोरी केली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंदाजे १,२०,२३६ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना दि. २२ मार्च २०२६ च्या रात्री १०:०० ते दि. २३ मार्च २०२६ च्या सकाळी ०८:०० वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी नळदुर्ग बूरेज क्र. १ ला लक्ष केले. चोरट्यांनी तेथील ​मुख्य सप्लाय केबल
​पॅनेल बोर्डमधील तांब्याचे वायर
​एम.सी.बी. (MCB) संच ​असे एकूण १ लाख २० हजार २३६ रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
​पोलीस कारवाई
​या चोरीप्रकरणी प्रसाद वळवंतराव कांबळे (वय ४६ वर्षे, रा. रावळ गल्ली, तुळजापूर) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दि. २१ एप्रिल २०२६ रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ऐतिहासिक ठिकाणच्या विद्युत साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.चोरांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नळदुर्ग परिसरातील नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे असे आवाहन करण्यात येत आहे. संशयित प्रकार दिसताच पोलिसांची संपर्क साधावा .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india