Best News Portal Development Company In India

तुळजापुरात मोठी दुर्घटना टळली! कमान वेस भागातील हायमास्टच्या शॉर्टसर्किटची तातडीने दुरुस्ती !

तुळजापुरात मोठी दुर्घटना टळली! कमान वेस भागातील हायमास्टच्या शॉर्टसर्किटची तातडीने दुरुस्ती !

तुळजापूर प्रतिनिधी :- नागरिकांच्या सुरक्षेतेकडे तातडीने लक्ष तुळजापूर नगर परिषदप्रशासनाने

शहरातील कमान वेस येथील डुल्या मारुती मंदिरासमोर असलेल्या हायमास्ट लाईटच्या वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. या बिघाडामुळे संपूर्ण हायमास्ट खांबात विद्युत प्रवाह (करंट) उतरला होता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून संभाव्य धोका यशस्वीपणे निवारण्यात आला आहे.

डुल्या मारुती मंदिर हा परिसर भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वर्दळीचा भाग आहे. येथील हायमास्ट लाईटच्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने खांबामध्ये करंट उतरला होता. ही बाब निदर्शनास येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांना दिलासा देत नगरपालिकेने

घटनेचे गांभीर्य ओळखून आदरणीय आमदार राणाजगजितसिंह (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष विनोद (पिटू भैय्या) गंगणे व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या सूचनेनुसार तातडीने पावले उचलण्यात आली. माजी नगरसेवक अमरीश भैय्या जाधव, दादासाहेब खपले आणि राजेश्वर (गुड्डू) कदम यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी हायमास्टची सर्व वायरिंग तपासून त्यातील दोष शोधला आणि तातडीने दुरुस्ती केली.

वेळेत दुरुस्ती झाल्यामुळे या भागात होणारा संभाव्य मोठा धोका टळला आहे. लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दाखवलेले कर्तव्यदक्षता याबद्दल कमान वेस भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

“नागरिकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. शॉर्टसर्किटची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेने त्वरित काम पूर्ण करून धोका दूर केला आहे.”

असा अनुचित प्रकार दिसल्यास ताबडतोब नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india