Best News Portal Development Company In India

परसबाग निर्मिती स्पर्धेत उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल तालुक्यात प्रथम १४०००रुपयाचे बक्षीस !

परसबाग निर्मिती स्पर्धेत उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल तालुक्यात प्रथम
१४०००रुपयाचे बक्षीस.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील आयएसओ मानांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सतत तीन वर्ष बक्षीस विजेत्या उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल ला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग निर्मिती स्पर्धेत यावर्षी उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ पारितोषक मिळालेले असून शाळेला १४००० चे रोख बक्षीस प्राप्त झाले आहे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या परसबाग निर्मितीला गेल्यावर्षीही तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पाच हजार रुपये रोख बक्षीस मिळाले होते केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागेतून उत्पादित ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरण्यात आला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मदतीने शालेय परसबाग निर्माण करून उत्कृष्ट देशी भाजीपाला, विविध प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांचे निर्माण करण्यात आले. यात दोडका भेंडी भोपळा वांगे मिरची, टोमॅटो पालक मेथी कोथिंबीर शेवगा अशा अनेक प्रकारच्या भाज्या परसबागेत मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात उत्पादित करण्यात आलेल्या आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाजीपाल्यासाठी सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करून सिंचन पद्धतीने पाण्याचा वापर करून शाळेतील टाकाऊ पदार्थाचा उपयोग करून मुलांकडून परसबागेचे व्यवस्थापन करण्यात आले. पालकांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या परसबागेत भरपूर प्रमाणात फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन निघाले. उत्पादित पालेभाज्या व फळभाज्यांचा उपयोग आहारात नियमित करून उर्वरित भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. उत्कृष्ट परसबागेस जिल्हास्तरावरून व तालुका स्तरावरून अनेक अधिकारी प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तींनी भेट देऊन परत बागेची पाहणी केली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे शकुंतला मोरे अशोक पतगे सदानंद शिवदे पाटील अमर वरवटे यांनी परसबागेचे कौतुक केलेले आहे. परसबागेतील भाजीपाल्याचा उपयोग परिसरातील नागरिकांना व पालकांनाही झालेला आहे.परसबाग निर्मितीसाठी प्रशालेतील धनराज तेलंग बशीर शेख विद्यानंद सुत्रावे सदानंद कुंभार नागेश स्वामी प्रवीण शिंदे सोनाली मुसळे भाग्यश्री पंडित वर्षाराणी पाटील वनमाला वाले सुनिता राठोड कविता केदारे सुमन साठे व सर्व विद्यार्थ्यांचे परिश्रम कामी आलेले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india