येडोळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य मिरवनूक संपन्न
——————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्ताने तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
येथील सिद्धार्थ कला व क्रीडा मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दि.२५एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने व आनंदाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.या जयंती उत्सवाची भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात आली.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या भव्य मिरवणुकीला सह वाद्य फटाक्याची आतिषबाजी करत सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉल्बीवर तरुणाई तिरकली. येथील भिमनगर येथून मुख्य रस्त्याने पाटील वस्ती,लोंढे वस्ती मार्गे माळावरील मुख्य चौकात ही मिरवणूक आली.या ठिकाणी अमरदीप लेझीम संघ नळदुर्ग, भिमशक्ती तरुण मित्र मंडळ काजीकणबस, SSLग्रुप अष्टा कासार, भिमसेना लेझीम संघ नंदगाव,कमलशिल लेझीम संघ हगरगा नळ,प्रबुद्ध लेझीम संघ दस्तापूर, बि.एस, के. लेझीम संघ गुजनूर,आदी लेझीम पथकाने आपले उत्कृष्ट लेझीम खेळाचे सादरीकरण केले.तर येथिल बालं भिम कन्या रनरागिनी स्नेहा महेश लोंढे यानी वैयक्तिक उत्कृष्ट नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.
याप्रसंगी येथील समता समता सैनिक दलाचे वरिष्ठ पदाधिकारी मल्लिनाथ लोंढे व अनिल लोंढे यांचा माजी सरपंच पद्माकर पाटील यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या वेळी रवी पाटील,रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, तालुका संघटक सुरेश लोंढे, रामचंद्र लोंढे, रिपाइं शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे,उपाध्यक्ष मारुती लोंढे,जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष भानुदास लोंढे,अर्जुन लोंढे,अंकुश लोंढे, लक्ष्मण लोंढे,प्रवीण कांबळे,अंबादास लोंढे,अमित लोंढे,डॉ.सुरज लोंढे,जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी रमेश लोंढे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,सचिव चंद्रकांत, उपाध्यक्ष दीपक वाघमारे,अनिल वाघमारे सह येडोळा,नळदुर्ग परिसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर जेटीथोर यांनी केले.






