मोहम्मद अयाज नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने सन्मानित .
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
(आशाताई भोसले यांना मोहंम्मद अयाज यांनी पुरस्कार समर्पित केले .)
नुकतेच- मुंबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सोलापूरचे गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मदअयाज यांना नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यातआला. हा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माता-निर्देशक मेहूलकुमार संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा दिनांक 24 एप्रिल 2026 पंचतारांकित हॉटेल रेडिसन येथे पार पडला या वेळेस मंचावर पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड , संजीवकुमार चौधरी , एसीपी संजय पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरत असलेल्या कलावंत व साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यात देश भरातून पुरस्कार विजेते सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोहम्मद अयाज नेल्सन मंडेला यांच्या साऊथ आफ्रिका येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या भारतीय संगीताचा प्रसार व प्रचार केलेला आहे . गाण्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जपणारे गायक मोहंम्मद अयाज यांनी हा पुरस्कार गुरुवर्य स्वर स्वामीनी आशाताई भोसले यांना समर्पित करत . हा पुरस्कार माझ्या संगीत वाटचालीस नक्कीच प्रौस्ताहीत ठरणार अशी भावना अयाज यांनी व्यक्त केली निर्माता-निर्देशक मेहूल कुमार , संगीतकार दिलीप सेन , संजीवकुमार चौधरी , पोलीस सहआयुक्त संजय पाटील आदि उपस्थित होते.







