उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये*
सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत एकलमातांची कार्यशाळा.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
39 विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी विजय जाधव यांचे मार्गदर्शन.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत एकलमाता पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साऊ समितीचे जिल्हा समन्वयक व मिशन वाशल्य समितीचे सदस्य शाळेचे माजी विद्यार्थी काका जाधव यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे उमरगा लोहारा तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील ज्योती माने बबीता गुरव उपस्थित होते. उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल मधील 39 विद्यार्थ्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत महिन्याला 2250 रुपयाचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची सविस्तर माहिती व त्यासाठी अर्ज कसा करावा. कोठे करावा. त्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव कशी करावी याची सविस्तर माहिती काका जाधव यांनी दिली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम शाळेने 100 टक्के करणार असल्याचे शिवाय यासाठी लागणारे विद्यार्थ्यांचे बँक पासबुक शाळेने अगोदरच काढून घेतले असून आता बोनाफाईड व उत्पन्नाचा दाखला शाळेकडून काढून देऊन सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म चार दिवसात भरून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा चे आयोजन करून सर्व एकल महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात एकल महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज तेलंग, बशीर शेख, सोनाली मुसळे, संजय रुपाजी, नागेश स्वामी ,भाग्यश्री पंडित, वर्षाराणी पाटील, प्रवीण शिंदे, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार सोनाली मुसळे यांनी मांनले






