Best News Portal Development Company In India

धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ,    माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी २४ तासांत गजाआड !

धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ,    माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी २४ तासांत गजाआड !
तुळजापूर प्रतिनिधी :-
माजी सैनिकाने एकट्याने सात दरोडेखोरा बरोबर वाघासारखी झुंज दिली.परंडा तालुक्यातील कुंभेज येथे एका माजी सैनिकाच्या वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकून दहशत माजवणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक २५/०४/२०२६ रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास मौजे कुंभेज येथील कॅनॉल जवळील शेतवस्तीवर ही धक्कादायक घटना घडली. माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप आणि त्यांची पत्नी घराबाहेर झोपलेले असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सीसीटीव्ही नसणे आणि अंधारामुळे आरोपींचे वर्णन उपलब्ध नसणे अशा परिस्थितीत हा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, गोपनिय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीवरून पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
शेतात वेढा घालून आरोपींना पकडले
आरोपी डोकेवाडी शिवारातील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. किरण पंडीत शिंदे (२६ वर्षे, रा. अनाळा)
२. राघवा निवांत्या शिंदे (२५ वर्षे, रा. अनाळा)
३. ज्ञानेश्वर लिग्या काळे (२३ वर्षे, रा. हिवर्डा)
४. विकास नागेश भोसले (२९ वर्षे, रा. डोकेवाडी)
५. सुनिल प्रकाश भोसले (२२ वर्षे, रा. अंजनसोंडा)
६. चेतन किरण शिंदे (१९ वर्षे, रा. अनाळा)
७. सुनिल चरण शिंदे (२२ वर्षे, रा. अनाळा)
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे गंठन, सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
दरोड्यासारखा गंभीर गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणल्यामुळे धाराशिव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरी रात्री नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे काही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा आव्हान करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india