जळकोट येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याची भव्य मिरवणुक
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयत्ती निमीत्ताने भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली .
कार्यक्रमांच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन अमोल लोखंडे आणि महादेव लोखंडे बाबुराव माने याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप धूप लावून पुजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक पंचशिल ग्रहण करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणूक निघाली गावातील हनुमान चौक प्रेमनाथ चौक व गावातील मुख्य बाजारपेठ छत्रपत्ती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक आली असता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज याच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन अरुण लोखंडे पंचायत समीतीचे सदस्य ॲड अशिष सोनटक्के सागर लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर युगपुरूष लेझीम संघाच्या युवकांनी भारधार लेझीमचे नृत्य सादर गेले तरुण तरुणी महिला आबालवृद्ध यानी पुणे येथील नामाकीत एके फोर टी . डी.जे च्या तालावर नाचून आपला आनंद व्यक्त केला न दमता न थाबता तब्बल सात तास तरुणाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गितावर आपले भारधार नृत्य केले शिवाजी चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणानी दनानुन गेला होता हजारो भिमसैनिकानी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवविला होता रमाई महिला मंडळाच्या महीलाचा या मध्ये उत्साह दिसून आला त्यानंतर ही मिरवणूक छत्रपती संभाजी नगर माहात्मा फुले वसाहत येथे गेली व तेथून परत भिनगर कडे आली . मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडाळाने या वर्षी महामानवाचे व महामाताचे फोटो आणि त्यानी केलेले कार्य याची माहिती देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली त्यात मुख्य आकर्षण म्हणजे भिमाकारेगाव पुणे येथील महार सैनिकांच्या स्मरनाथ बांधण्यात आलेले विजय स्तंभाचा देखाव्याने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले या मिरवणुकीत माजी सरपंच अशोक पाटील महेश कदम कृष्णात मोरे संजय माने संजय अंगुले संतोष वाघमारे हणमंत अंगुले नागनाथ किलजे मंगेश सुरवसे जीवन गुळे प्रदिप लोखंडे प्रविण लोखंडे मुकेश लोखंडे अजय लोखंडे महेश लोखंडे अभिमन्यू लोखंडे प्रकाश लोखंडे सुरेश लोखंडे अरविंद लोखंडे परमेश्वर लोखंडे सागर लोखंडे विनोद लोखंडे राजेश उर्फ छोट्या लोखंडे दिपक लोखंडे जगदीश लोखंडे संतोष लोखंडे शुभम पासोडे जीवन लोखंडे बीबीसेन लोखंडे सतिश गायकवाड ज्ञानेश्वर लोखंडे लहू लोखंडे सतिश माने सुनिल माने मलीनाथ माने हरिदास लोखंडे सुरेश लोखंडे बब्रूवान सोनकांबळे सचीन गायकवाड अभिनव सोनकांबळे सह गावातील समस्त नागरीक व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . ही मिरवणूक अंत्यत शिस्तबद्द आणि शांतेत पार पडली . आंबेडकर जयंती उत्सव समीतीचे सर्वत्र कौतुक होत आहे .







