उमररगा तालुक्यात पाण्याच्या शोधात व उदरनिर्वाहाच्या शोधात वन्यजीव प्राणी काळविटाचा म्रुत्यु.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
राज्महामार्ग क्रमांक ४९ तुरोरी ते लगडधानोरा या मार्गावर दि.२८ रोजी मारुती ईनाम जमीनीच्या कडेला उस पिकाच्या बाजुला खड्ड्यात काळविट प्राण्याचा म्रुत्यु झाला असुन रस्ता ओलांडताना अज्ञात वाहणाच्या धडकेत जीव गमावला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन
मयत काळविटाच्या शरीराचे कुत्रे लचके तोडत असताना जनतेचे लक्ष वेधल्याने समजुन आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी यांना कळविले असता तात्काळ वनविभाची पेट्रोलींगची गाडीसह वि.का.वनरक्षक उमरगा आर.एस.ईंगळे व वनमजुर नामदेव जमादार धाव घेऊन मयत काळविटास उमरगा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी हालविण्यात आले व
काळविटाचे कुन्हाळी येथील वनपरिक्षेत्रात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे वनविभागाच्या कर्मचारी यांनी तुळजाई एक्स्प्रेस शी संवाद साताना सागीतले.
महिनाभरात वन्यजीव प्रणी वानर विजेच्या धक्त्याने तारेस लटकुन मरण पावले आहे तर वन्यजीव
प्राणी काळविटाच्या म्रुत्यु ची दुसरी घटना असुन प्रण्याच्या सौरक्षणाची काळजी
घेण्यासाठी जिँल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्यासाठी जनतेची मागणी जोर धरत आहे.






