तलमोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
तलमोड प्रतिनिधी आनंद सुर्यवंशी.
तालुक्यातील तलमोड येथे दि.२७रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची १३५ वी जयंती भिमनग रवासीयाकडुन साजरी करुन अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी ५ते९ दरम्यान भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रथामध्ये थाटामाटात भव्य अशी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली होती .
मिरवणुकीमध्ये सालेगाव येथील लेझीम कलापथकाने लेझीमवर ठेका धरुन सुंदर सादरीकरण करुन उपस्थितांचे मने जिंकली, अकर्षक विध्दुत रोशनाई सह फटाक्यांच्या अतिषबाजी व तरामंडळ ने गाव परिसर दनानुन गेले होते.
माजी पंचायत समिती उपसभापती, पंचायत समिती सदस्य दगडु कालिदास मोरे पत्रकार संजय मोरे,यांनी मीरवणुकीचे स्वागत करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मिरवणु समारोपानंतर कपिल वस्तु बुद्धविहार येथील भंतेजी सुमंगल यांनी सामुहिक त्रीसरण पंचशील, बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आले.
यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र चंद्रकांत गायकवाड,उपाध्यक्ष धोंडीराम गुलाब गायकवाड, विष्णू गोरोबा कांबळे, अशोक पांडुरंग गायकवाड, राजेंद्र बाबुराव सुगीरे,पोलिस पाटिल पवन महारुद्र स्वामी,ग्रामपंचायत सदस्य मल्लीनाथ स्वामी,बिट अमलदार चैतन्य कोगुलवार,बुदिष्ट सोसायटी चे माजी तालुका अध्यक्ष अनंतकुमार कांबळे,उपजिल्हा रुग्णालय उमरगा चे माजी अधिक्षक पंढरीनाथ कांबळे,
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे अमर गायकवाड, समाजसेवक शिवाजी पिस्के,पत्रकार आदिनाथ भालेरावअदिसह मान्वर उपस्थित होते.
उपस्थित मान्वरांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बौध्द उपासक उपासिका,बालक,बालीका सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्याचे निरिक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलमोड बिट अमलदार चैतन्य कोगुलवार यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.)







