वागदरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची भव्य मिरवणुकीने सांगता
—————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आयोजित
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता अखेर भव्य मिरवणुकीने करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी ता.तुळजापूर च्या वतीने दोन दिवशीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
. दि.२७ एप्रिल २o२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने “जागर महामानवाच्या विचारांचा ” या सदरा खाली व्याख्यान,मान्यवरांचा सत्कार शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व भिम गीत गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदीपान वाघमारे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद धाराशिव चे अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर अण्णा कोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी,पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले,नळदुर्ग नगर परिषदेचे नगर सेवक तथा विरोधी पक्ष गट नेते मारुती खारवे,रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, समता .सैनिक दलाले मल्लिनाथ लोंढे आधी उपस्थित होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भिवाजी इंगोले,मारुती
खारवे, बाबासाहेब बनसोडे,मल्लिनाथ लोंढे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तर आम्रपाली गायन पार्टी मौज किलज, पंचशील गायन पार्टी वागदरी यांचा भीम गीत गायनाचा जंगी कार्यक्रम संपन्न झाला.
तर दि.२८ एप्रिल २o२६ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून सहवाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी अमरदीप लेझीम संघ नळदुर्ग व बी,आर.लेझीम संघ वागदरी यांनी उत्कृष्ट लेझीम पथकाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची म्हणजे जिंकली.
. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,सचिव चंद्रकांत वाघमारे,उपाध्यक्ष दीपक वाघमारे,सदस्य एस.के. गायकवाड,राजकुमार वाघमारेआदी सह जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस. के. गायकवाड यांनी केले.
. यावेळ भालचंद्र यादव,मदन पाटील, किशोर धुमाळ, अमोल पवार,किशोर सुरवसे, जितेंद्र पाटील सह ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







