उमरगा ते औसा महामार्ग क्रमांक५४८ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची आमदार प्रविण स्वामी यांनी केली पहणी.
संबंधित विभागाच्या प्रशासनावर तिव्र नाराजी.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडले असून काहींना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. तरीदेखील संबंधित विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रविण स्वामी यांनी सदर मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची गंभीर स्थिती लक्षात घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही. रस्त्याची दुरुस्ती कामे तातडीने सुरू करून अपघातांची मालिका थांबवावी, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, नागरिकांनीही लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली आहे यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील हे उपस्थित होते








