श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा !
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी , जगतजनानी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. तेंव्हापासून दरवर्षी १ मे हा दिवस संपूर्ण राज्यभर ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन केले.
या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, रामेश्वर वाले, अनुप ढमाले, विक्रम कदम तसेच पोलिस कर्मचारी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त सलग सुट्ट्या आल्याने मंदिर परिसरात भाविक भक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली प्रचंड अशा चटकदार उन्हात सुद्धा भाविक भक्तांच्या देवीच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या तरी सुद्धा मंदिर संस्थांच्या योग्य नियोजनामुळे सर्व भावीक भक्तांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता आला.








