‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन!
तुळजापूर प्रतिनिधी ;- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी चरणी अनेक मोठे दिग्गज नेते ,सेलिब्रिटी,हीरो, अदाकारा ,आपल्या कार्यात यश मिळावे म्हणून येत असतात .आजही राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले.
अनेक भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आई तुळजाभवानी ही प्रामुख्याने ओळखली जाते.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर एक चित्रपट स्वतः करण्याची त्यांची खूप वर्षापासून ची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.हे त्यांचे स्वप्न होते आणि ते सत्यात उतरल्यामुळे ते देवीचरणी आज नतमस्तक झाले.अंगावर शहारे आणणारा असा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन पहावा असे आवाहन करण्यात येत आहे.







