प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा शुक्रवारी (दि. १) संस्थेच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील व संस्थेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह, बुके आणि मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, प्राध्यापक हा केवळ तासिका घेणारा कर्मचारी नसून तो पिढ्या घडवणारा खरा शिल्पकार असतो.डॉ.पंचगल्ले यांनी आपल्या सेवाकाळात पुस्तकी ज्ञानासोबतच हजारो विद्यार्थ्यांना जगण्याची दिशा दिली.त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला यापुढेही होत राहील. याप्रसंगी सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले,चंद्रशेखर यम्मे,शिवाजी शिंदे,पालिकेचे गटनेते गणेश अंबर,प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार,प्राचार्य उल्हास घुरघुरे आदींची उपस्थिती होती.सत्काराला उत्तर देताना डॉ.पंचगल्ले भावूक झाले होते.या महाविद्यालयाने मला ओळख दिली आणि इथल्या विद्यार्थ्यांनी मला सदैव कार्य करण्याची ऊर्जा दिली अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले.डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी आभार मानले.या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.







