Best News Portal Development Company In India

वागदरी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न !

वागदरी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
———————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
सबंध विश्वाला शांतीचा समतेचा अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने वागदरी ता.तुळजापूर येथे विविध कार्यक्रम करून आभिवादन करण्यात आले.
. दि.१ मे २o२६ रोजी वैशाखी पौर्णिमा रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी ता. तुळजापूर च्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील पंचशील बुध्द विहार समाज मंदिराच्या प्रागंणात बुद्ध जयंती निमित्ताने सकाळी आठ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ठिक ७.३० वाजता तथाग महात्मा गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन नवोदित वधू वर धम्मदीप बनसोडे व ऋतिका गायकवाड, यांच्या शुभ हस्ते तर जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष महादेव वाघमारे,उपाध्यक्ष दीपक वाघमारे,सचिव चंद्रकांत वाघमारे,सदस्य एस.के . गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून फोटो प्रतिष्ठापना करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली तर आर्केस्ट्रा कलावंत तानाजी भोरे पुणे यानी “पिंपळाच्या पानावर कोरले नाव ते बुद्धांचे,बोद्धी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे ” हे गीत सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी बोलताना रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड म्हणाले की बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच चांगल्या संस्काराची गरज असून
सुसंस्कृत आणि निर्व्यसनी समाज निर्मितीसाठी महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकरांनी आपणाला बौद्ध धम्म दिला आहे.तेंव्हा शिक्षण घेवून मानवतेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धम्म पद्धतीने आपण आपले जीवन व्यथित करून आपला सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा असे आवहान केले.
शेवटी बुद्ध जयंती निमित्त भोजनदान देवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महिला ग्रामस्थ जेष्ठ कार्यकर्ते युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india