प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम…
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि २ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९३.८७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी सर्व शाखांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. शाखानिहाय निकालाची टक्केवारी विज्ञान ९५.६६ टक्के, वाणिज्य ९१.३० टक्के तर कला शाखेचा ८८.६३ टक्के निकाल लागला. कला शाखेत प्रतीक्षा संतोष गावडे (८८.१७ टक्के, प्रथम), माही महेश चव्हाण (७६.१७ टक्के, द्वितीय), काजल तानाजी पवार (७३.६७ टक्के, तृतीय), वाणिज्य शाखेतून रिया मारुती जाणे (८५.१७ टक्के, प्रथम), सुजाता शिवानंद जोशी (८२.१७ टक्के, द्वितीय), क्रिश अनिल बनसोडे (७२.५० टक्के, तृतीय) तर विज्ञान शाखेतून प्रणाली परमेश्वर जवळगे (८५.६७ टक्के, प्रथम), भाग्यश्री बंडाप्पा च्यारे (८५.१७ टक्के, द्वितीय), प्रेमदीप प्रकाश जिंतूरकर (८४.१७ टक्के, तृतीय) क्रमांक पटकाविला. विज्ञान शाखेतून ३७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, २०६ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून २ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १३ विद्यार्थी प्रथम श्रेणी, २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेतून २ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ४० विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, संचालक तथा उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव, प्राचार्य उल्हास घुरघुरे, उपप्राचार्य उमाकांत महामुनी, उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोंढारे, पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे, सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाने मुरूम परिसरात पालक व नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.








