उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील वाढत्या वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुरूम नगर परिषद कार्यालयात आज (दि. २ मे) महावितरण बद्दल तक्रार निवारण बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शेतकरी, नागरिक, व पत्रकार उपस्थित होते दरम्यान मुरूमच्या शेतकऱ्यांनी 29 एप्रिल रोजी महावितरण कार्यल्यावर मोर्चा काढला होता याची दखल घेत आमदार प्रविण स्वामींनी आज शेतकरी व महावितरण यांची एकत्र बैठक घेऊन वीज समस्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला
नगर पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत वीज समस्या बद्दल चर्चा झाली .यामध्ये गाव आणि शेतीसाठी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, आणि कमी दाबाचे वितरण तसेच ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना, नवीन वीज जोडण्यातील विलंब आदी समस्यांवर शेतकऱ्यांनी गऱ्हाणे मांडले विशेषतः शेतीपंपासाठी अपुरा व कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळत असून यामुळे आर्थिक आणि पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडल्या.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्या वेळेत मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आणि महावितरणसमोर ज्या कांही अडचणी आहेत व कुठे अडथळे निर्माण झाल्या आहेत त्याबद्दल बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगितले व विज पुरवठाबद्दल नागरिकांना होणारा त्रास थांबवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान काही तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले, तर उर्वरित प्रश्नांवर लवकरच ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी मुरूम शहरासाठी स्वतंत्र १३३ केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच उच्च दाबाने वीजपुरवठा करणे आणि वागदरी ते आलूर वीज वाहिनीचे रखडलेले काम तातडीने सुरू करणे, केसर जवळगा येथे एकदिवसाआड होणारा वीजपुरवठा नियमित करणे आणि शेतीसाठी किमान ६ तासांचा सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
बैठकीला ज्येष्ठ नेते बसवराज वरनाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी. एस. रेकुलवाड, कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे, मुरूम ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता गणेश शेंबाडकर, उमरगा ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता जे. एस. हिंगमिरे उपस्थित होते. तसेच शेतकरी नेते राम डोंगरे, श्रीमंत भुरे, अनिल बिराजदार, गोविंदसिंग राजपूत यांनी बैठकीत समस्या मांडले यावेळी मुरूम, केसर जवळगा व बेळंब येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून मुरूम शहरात पहिल्यांदाच बैठक घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधले






