Best News Portal Development Company In India

प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !

प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यातील मुरूम येथिल प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.४ चार वार सोमवार रोजी १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच अतिशय उत्साहात पार पडला..
शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले यावर्षीच्या १२बोर्ड परीक्षेत गुणानुक्रमे कला वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य म्हणाले,”विद्यार्थ्यांचे हे यश केवळ गुणांचे नाही, तर त्यांच्या जिद्द आणि कष्टाचे फळ आहे.” तसेच, शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आणि पालकांच्या सहकार्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला [३, सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांपैकी १२ वीतील यशस्वी विद्यार्थी प्रतीक्षा गावडे आपल्या भावना व्यक्त करताना या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले.त्यांना अश्रूचा अनावर झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य उमाकांत महामुनी सूत्रसंचालन सतीश रामपुरे व आभार अजित सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम संपन्न झाला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india