Best News Portal Development Company In India

हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण!

हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण!

तुळजापूर प्रतिनिधी ;- भक्ती शक्तीची देवता आई तुळजाभवानी चरणी भाविक भक्ताकडून देवी जगदंबेच्या आशीर्वादाची मोठ्या श्रद्धेने परतफेड म्हणून सव्वा दोन किलो चांदी आनंदाने अर्पण . हैदराबाद येथील श्री तुळजाभवानी देवींचे भाविक पटोला सबिथा इंद्रा रेड्डी यांनी आज श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार व ढाल अर्पण केली.

रेड्डी हे आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीला सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार आणि ढाल अर्पण करून श्री तुळजाभवानी देवी प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली.

आई जगदंबेचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावा अशी अनेक भाविक भक्तांची श्रद्धा असते. आईने दिलेल्या आशीर्वादाची किंमत करता येत नाही म्हणून भाविक भक्त आपापल्या परीने दानधर्म करण्याचा प्रयत्न करतात. भक्तांनी केलेले दान हे इतरांच्या कामी पडावे याचे योग्य नियोजन मंदिर समिती नेहमी करत असते. देवी आणि भक्त यांचे अतूट नाते अशा प्रसंगातून दिसून येते. आई तुळजाभवानी चरणी दानधर्म करण्याची प्रथा अनादी कालापासून चालत आलेली आहे. तुळजापूर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india