परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव (तुु.)/ नळदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
—————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
डॉ. आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट आळजापूर ता.बार्शी जि.सोलापूर आणि पंचशील तरुण मंडळ सावरगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव /नळदुर्ग तालुका तुळजापूर या संस्थेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परिवर्तन सामाजिक संस्था नळदृग शी गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी,युवक अशा विविध विषयावर सामाजिक कार्य करीत असून या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन दिनांक ३ मे २o२६ रोजी सावरगाव येथे आंबेडकरी शाहिरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते परिवर्तन सामाजिक संस्थेला सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेकडून संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी हा सन्मान स्वीकारला आहे.या कार्यक्रमास तुळजापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यातील धाराशिव तालुक्यातील अनेक गायक कलावंत उपस्थित होते. ॲड .बाबासाहेब बडवे, हरीश फटके, दिलीप फडके, हणमंत फडके यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
यावेळी ॲड. राम ढवळे, गायक जीवन शिंदे, प्रा.डॉ. दुष्यंत कठारे,सचिन सोनवणे, निलेश वाघमारे उपस्थित होते






