Best News Portal Development Company In India

तुळजापूर रहदारीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणे पडले महागात ५ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल !

तुळजापूर रहदारीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणे पडले महागात ५ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल!
​तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापुरात अवैद्य प्रवासी वाहतुकीवर आणि बेशिस्त वाहन चालकावर तुळजापूर पोलिसांनी मोठी कारवाई केले आहे .तुळजापूर शहरातील मुख्य चौक आणि सार्वजनिक रस्त्यांवर रहदारीस धोकादायक ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या ५ वाहनचालकांवर तुळजापूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
​दिनांक ६ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० ते सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास तुळजापूर पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त घातली. यावेळी विश्वनाथ कॉर्नर, नवीन बसस्थानक, राज पॅलेस समोर, पुष्पविहार हॉटेल आणि शंभुराजे हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही वाहनचालकांनी आपली वाहने बेशिस्तपणे उभी केल्याचे आढळून आले. यामुळे इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
​कारवाई करण्यात आलेले आरोपी आणि वाहने:
चालक/आरोपीचे नाव पत्ता वाहन आणि क्रमांक
नितीन माणिक जाधव (३८ वर्षे) खंडाळा, ता. तुळजापूर ऑटो रिक्षा (MH 25 AK 1431)
सचिन बिभीषन सरडे (४० वर्षे) अपसिंगा, ता. तुळजापूर ऑटो रिक्षा (MH 25 AK 2658)
मनोज दिलीप टिंगारे (३१ वर्षे) मंगळवार पेठ, तुळजापूर टाटा मॅजीक (MH 13 AZ 6989)
शरीफ उस्मान शेख (४२ वर्षे) तडवळा, ता. तुळजापूर टाटा मॅजीक (MH 13 AZ 5795)
चंद्रकांत भैरु डोंगरे (३८ वर्षे) घाटशिळ रोड,
सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुळजापूर पोलिसांनी दिला आहे.
​सदर कारवाई तुळजापूर पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून केली असून, शहरात बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
बेशिस्त वाहन चालकांना आणि तुळजापुरातील वाहतुकीला योग्य शिस्त लागावी एवढीच अपेक्षा
आहे. असे जनमाणसातून बोलले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india