Best News Portal Development Company In India

दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के गुण घेतलेलेल्या मोहित नाईकवाडी याचा सत्कार!

दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के गुण घेतलेलेल्या मोहित नाईकवाडी याचा सत्कार!

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात केवळ ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या कळंब तालुक्यातील शिराढोण येथील मोहीत
नाईकवाडी या विद्यार्थ्यांचा सेवाग्राम येथील जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी सत्कार केला आहे .
गेल्या दोन दिवसा पासून दहावी च्या परीक्षा निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहेत . या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकां कडून काही सामाजिक शैक्षणिक संघटना कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जात आहे. गरीबीवर मात करून नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत शिराढोण ता . कळंब येथील मोहीत नाईकवाडी या विद्यार्थ्यांने सर्वच विषयात ३५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या वडीलांचा हॉटेल व्यावसाय आहे. हॉटेल मध्ये काम करून आपल्या वडिलांच्या संसाराला हातभार लावणाऱ्या या विद्यार्थ्याचा सन्मान व्हावा या करिता सेवाग्राम येथील जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्हा परिसरातील अश्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पाटील यांनी घेतली आहे. कवठा येथील सेवाग्राम कनिष्ठ महाविद्यालयात आशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे. गरीब मुळे शैक्षणिक गुणवत्ता संपुष्टात येऊ नये म्हणून गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा निर्धार सेवाग्राम च्या वतीने पाटील यांनी केल्याचे सांगितले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न मानण्यात येणाऱ्या संस्था चालकांनी ३५ गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india