जळकोट येथे जागतिक परिचारिका दिन साजरा
– – – – – – – – – – – – – –
–
येथील प्राथिमीक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा करण्यात आला सन्मान
– – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आरोग्य केंद्रात १२ मे हा दिवस जागतिक परिचारीका दिन म्हणून साजरा करण्यात आला .
१२ मे १८२० रोजी इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यानी वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यानी आरोग्य सेवा करून समाज सेवा करण्याची इच्छा त्यांच्या वडीला जवळ वक्त केली पण वडीलाचा परिचारिका (नर्स) म्हणून काम करण्याचा विरोध होता पण त्यांनी जन्म झाल्यानंतर जेव्हा त्याना समज येवू लागली तेव्हापासून समाज सेवा आणि रुग्ण सेवा करण्याची मनापासून इच्छा होती म्हणून त्यांनी इ .स. १६५४ साली इंग्लंड मध्ये झालेल्या क्रिमयन युध्दात जखमी झालेल्या सैनिकाना मलमपट्टी करणे त्याची संपूर्ण सेवा करणे व त्यांची संपूर्ण काळजी घेणे इत्यादी कामे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी निस्वार्थ पणे अविरित पणे केली व या सेवेच्या मोबदल्यात सैनिक त्याना बक्षिस देवू करित पण ते त्या बक्षिसांचा स्वीकार त्यांनी कधीही केला नाही . त्या मोबदल्यात त्यांनी नर्सिंग स्कूल काढण्यासाठी त्या पैश्याचा उपयोग केला . त्यांची सेवा पाहून युद्धभुमीवर सैनिक त्याच्याकडे आदाराने पाहात असत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्याना “लेडी ऑफ लॅम्प हा किताब देण्यात आला म्हणून या आरोग्य सेवा कार्याची दखल घेवून त्याचा जन्म दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो त्याचे अवचीत साधुन येथील गणेश सोनटक्के मित्र परिवराच्या वत्तीने प्राथमिक केंद्रातील परिचारीकांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पंचायत समीतीचे सदस्य अँड अशिष सोनटक्के व अरुण लोखंडे यांच्या हस्ते श्रीमती संगिता आर्किडे निकीता दाबेकर सेनाज मुलाणी रेश्मा सोनवणे नम्रता फुले आदीचा शाल पुष्प गुच्छ आणि पेढा भरवून सत्कार करून शुभेच्छा देण्यातआले . यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय आधिकारी डॉ रोहीत कवठे . विरभद्र हासुरे दत्तात्रय जगताप महादेव धरणे सौगदार पवार जेष्ठ नागरीक काशिनाथ वाडीकर सह ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते .







