धार्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दाळींब येथे ह.भ.प.निव्रत्ती महाराज देशमुख ईंदोरीकर यांचे समाज प्रबोधन.
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे दि.१३ रोजी “शरण पाटील” फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी कीर्तनाला आवर्जून उपस्थिती लावली.
आपल्या प्रभावी कीर्तनातूनह.भ.प. इंदोरीकर महाराजांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश दिला. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन, मोबाईलचा अतिरेक टाळण्याचे आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शरण पाटील” फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. त्याचबरोबर माझ्याबद्दल बोलताना, “शरण पाटील तरुण आहेत, त्यांना जनसेवेची आवड आहे. लोकांनी त्यांच्याकडे जाऊन जनसेवा करून घ्यावी,” असे उद्गार ह.भ.प. निव्रत्ती महाराज ईंदोरीकर यानी काढले.
माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याने केलेल्या सामाजिक कार्याची ही एक मोठी पोचपावती असून, इंदोरीकर महाराजांनी केलेल्या या कौतुकामुळे समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळालीअसे मत शरण पाटिल यांनी व्यक्त केले.









