उमरगा येथे SIRप्रशिक्षण व मन की बात कार्यक्रम यशस्वी
प्रदेश सरचिटणीस सुनील राणे
उपस्थित..
उमरगा:/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
आज उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने SIR जिल्हा प्रशिक्षण वर्ग तसेच ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीदरम्यान माननीय प्रदेश सरचिटणीस साहेबांनी SIR मतदार यादी संदर्भात कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले, तसेच आगामी ‘मन की बात’ या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनाबाबत विविध सूचना दिल्या. कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करत प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी सक्रिय राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.या वेळी माजी मंत्री तथा भाजपाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
आजच्या या बैठकीस सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, सौ. अर्चनाताई पाटील, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन काळे, श्री. माधव पवार, श्री. विजयकुमार सोनवणे, सौ. उषाताई येरकर, श्री. नितीन भोसले, श्री. दिलीप भालेराव, श्री. प्रदीप शिंदे, श्री. प्रकाश आष्टे, श्री. सुनील कुलकर्णी, ॲड. श्री. अनिल काळे, श्री. बसवराज कस्तुरे, श्री. सचिन पाटील, श्री. दिलीपसिंग गौतम, ॲड. श्री. साई टाचले, श्री. भरत मारेकर, श्री. गणेश अंबर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.








