Best News Portal Development Company In India

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचा तुळजापुर येथील कँपमध्ये डंका!

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचा तुळजापुर येथील कँपमध्ये डंका!

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

श्री तुळजा भवानी सैनिकी शाळा , तुळजापुर येथे सीएटीसी 204 कँप दि.05 ते 14 मे 2026 रोजी वार्षिक शिबिर संपन्न झाले.53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्यावतीने या कँपचे आयोजन करण्यात आले होते.कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कँप पार पडला.कॅडेटसना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये चरित्र,नेतृत्व,देशभक्ती,शिस्त, एकता,अनुशासन,ड्रिल,कवायत,खेळ,फायरिंग,फ्लॅग एरिया,टेंट पिचिंग,ऑब्स्टिकल,मॅप रिडींग,व्यक्तिमत्व विकास,सांस्कृतिक कार्यक्रम आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. या कँप मध्ये शिवाजी महाविद्यालयातील कॅडेटसनी घवघवित यश संपादन केले या कॅडेसटना कर्नल संतोष नवगण व कर्नल वाय बी सिंह यांनी प्रमाणपत्र, पदक देऊन त्यांचा सन्मान केला.मुलींमध्ये बेस्ट फायरर वैष्णवी कांबळे पायलटिंग व ड्रिल, उत्कृष्ट खेळाडु प्रज्वल काळे ड्रिल व गार्द ऑफ ऑनर,पायलटिंग रंजना भोसले व गायन,ड्रिल मध्ये सागर परीट,राम ममाळे व फायरिंग,पंकज जमादार ड्रिल, फायरिंग व गार्ड ऑफ ऑनर,तसेच थल सैनिक कँप ऑब्स्टिकल मध्ये अमित भोसले,राधा ममाळे,सानिया शेख व ड्रिल तसेच टेंट पिचिंग मध्ये रोहित जमादार,दिव्या लाळे ,प्रदुम्न साळुंके व गायन, तबला,ढोलकी वादन विशाल बरकंबे या सर्व कॅडेटसनी वेगवेगळ्या क्षेत्रात घवघवित यश संपादन करून महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला.या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे,उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ प्राचार्य डॉ संजय अस्वले,डॉ पदमाकर पिटले एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, प्रा गुंडाबापू मोरे, शैलेश महामुनी,राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कँपसाठी शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india