Best News Portal Development Company In India

उमरगा तालुक्यात शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फोडला; ४० हजारांचे साहित्य लंपास!

उमरगा तालुक्यात शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फोडला; ४० हजारांचे साहित्य लंपास!
तुळजापूर प्रतिनिधी:- उमरगा बस स्टॅन्ड चोरांचा अड्डा ठरत असून सोबतच चोरट्यांनी आता शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन असलेला ट्रॅक्टरला सुद्धा सोडलेले नाही. तालुक्यातील एकुरगावाडी येथील एका ६८ वर्षीय शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचे महागडे सुटे भाग अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, राम ईश्वर सोलगे (वय ६८ वर्षे, रा. एकुरगावाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक: एमएच २५ एच ७६२९) नेहमीप्रमाणे उभा केला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने या ट्रॅक्टरला लक्ष्य केले. चोरांनी ट्रॅक्टरची बॅटरी, हायड्रोलिक मांड्या सेट, रुटर शाफ्ट पीटीओ, चॅनल हुक साखळ्या, स्टार्टर, सीट आणि एअर क्लिनर असे ट्रॅक्टरचे महत्त्वाचे सुटे भाग चोरून नेले.
​चोरीला गेलेल्या एकूण मालाची किंमत अंदाजे ४०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
​आपल्या ट्रॅक्टरमधील साहित्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकरी राम सोलगे यांनी तातडीने उमरगा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) दि. १४ मे २०२६ रोजी उमरगा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
​शेतकऱ्याच्या वाहनाला लक्ष्य करून झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शेतकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून अनुचित प्रकार दिसताच पोलिसांची संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india