Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू!

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू!

तुळजापूर प्रतिनिधी:- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने दिनांक १७ मे २०२६ ते २१ मे २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी अर्ज शुल्क खुला, एसईबीसी व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रु. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०० रु. निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २१ मे २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत राहणार आहे.

ऑफलाईन अर्ज विक्री व स्वीकृती ठिकाण श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://sainikividyalayatuljapur.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाकडून पहिली गुणवत्ता यादी २३ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया २६ मे २०२६ ते २९ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी वयोमर्यादेच्या निकषानुसार विद्यार्थ्यांचा जन्म १ जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०११ दरम्यान असणे आवश्यक आहे.

विद्यालयात अनुभवी शिक्षकवृंद, एनडीए व एसएसबी तयारीसाठी निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, विज्ञान शाखेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा एसएससी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी पर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेणे बंधनकारक राहणार असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट होणे आवश्यक राहणार आहे.

अधिक माहितीसाठी ९४०३५३९०४४, ९९६०६१७००२ किंवा ७५८८९३८४९४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने व प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india