Best News Portal Development Company In India

नांदेड जिल्ह्यातील विधिज्ञांनी आमच्या पॅनल वर विश्वास दाखवून भरघोस मतांनी विजयी केले,त्यांच्या अडचणी सोडविणार…अँड.यदुपत अर्धापूरकर!

*नांदेड जिल्ह्यातील विधिज्ञांनी आमच्या पॅनल वर विश्वास दाखवून भरघोस मतांनी विजयी केले,त्यांच्या अडचणी सोडविणार…अँड.यदुपत अर्धापूरकर*

तालुका न्यायालय अर्धापूरच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत व भव्य सत्कार

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

जिल्ह्यातील विधिज्ञांनी आमच्या अधिवक्ता एकता पॅनेलवर विश्वास दाखवून खूप मोठ्या मताधिक्यांनी आम्हाला विजयी केले आहे.येणाऱ्या काळात सर्व विधिज्ञांचे व नागरिकांच्या अडचणींत आम्ही धावुन जाणार आहोत,प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.तालुका न्यायालय अर्धापूर येथील अर्धापूर तालुका अधिवक्ता संघांनी केलेला सत्कार हा आमच्यासाठी खूप विशेष व अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्हा अधिव्यक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.यदुपत श्यामसुंदरराव देशमुख अर्धापूरकर यांनी (दि..१४ )गुरूवार रोजी दुपारी तालुका न्यायालय अर्धापूर येथे केले.
तालुका न्यायालय अर्धापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष,पदाधिकारी व सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.यदुपत अर्धापूरकर,सचिव अँड.कपील पाटील,महिला उपाध्यक्ष अँड. दिपाली डोनगांवकर,महिला सहसचिव अँड.सुजाता बगाटे, कोषाध्यक्ष अँड.मंगेश जामनिक, सदस्य अँड.मुक्ता पवार,अँड. रामसिंग मठवाले,अँड.प्रिती हटकर, अँड.राजु हटकर,अँड.बाबु गावंडे, यांचे सर्वप्रथम अर्धापूर बसस्थानक येथे आगमन झाले की,फटके फोडत ढोल,ताशे व बॅन्डच्या गजरात अर्धापूर न्यायालयाच्या कमानी समोर आगमन करून तिथे तात्काळ अभिनंदनाचे बॅनर लावून परत फटाके फोडून न्यायालयामध्ये आगमन केले.कार्यक्रमाची सुरूवात अधिवक्ता हाॅल क्र.२४ मध्ये करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्धापूर न्यायालयाच्या आदरणीय न्यायाधीश श्रीमती.आर. बी.सोरेकर ह्या होत्या.सर्वप्रथम नवनियुक्त नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड.यदुपत अर्धापूरकर यांचे आजोबा कै.अँड. श्यामसुंदरराव व्यंकटराव देशमुख अर्धापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्वांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर नवनियुक्त नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड.यदुपत श्यामसुंदरराव देशमुख अर्धापूरकर यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षा न्यायाधीश आर.बी.सोरेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला व त्यानंतर न्यायाधीश सोरेकर मॅडम यांचा सत्कार नवनियुक्त नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड.यदुपत अर्धापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर अधिवक्ता संघ अर्धापूरचे कोषाध्यक्ष अँड.जी. बी.पत्रे,अधिवक्ता एकता पॅनलच्या विजयी अँड.मुक्ता पवार,अँड. दिपाली डोणगांवकर,अँड.अभिजीत पांडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने केलेल्या जंगी स्वागत व सत्काराला नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अँड.यदुपत श्यामसुंदरराव देशमुख अर्धापूरकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,अर्धापूर हे माझे असून मी अर्धापूरचा आहे त्यामुळे वकिलांच्या बाबतीत मी कधीही कोणत्याच कामात कमी पडणार नाही.मी अध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या पुर्वीही वकिलांची कामे करित आलो,अध्यक्ष असतांनाही करणार व पुढे चालून अध्यक्ष नसतांनाही वकिलांची कामे नेहमी करणारच असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी उपस्थित अधिवक्ता संघ अर्धापूरचे सचिव अँड.डि.एम. लोणे,ज्येष्ठ विधिज्ञ अँड.डि.बी.दासे, अँड.ए.आर.चाऊस,अँड.बी.व्ही.नवले,सहाय्यक सरकारी अभिवक्ता विशाल परदेशी,अँड.नितेश लोणे, अँड.दिलीप मोरे,राजेश्वर देशमुख, मुंजाजी कु‌‌र्हे,तजम्मुल खान यासह न्यायालयीन कर्मचारी गोविंद वाघमारे,राम चिकाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुंदर,उत्कृष्ट व नियोजनबद्ध सुत्रसंचलन अधिवक्ता संघ अर्धापूरचे सदस्य अँड.गौरव उध्दवराव सरोदे यांनी केले तर उत्कृष्ट आभार प्रदर्शन अँड.सय्यद इम्रान यांनी करून हा कार्यक्रम नियोजनबद्ध रित्या सर्व विधिज्ञांनी यशस्वी पार पाडला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india