तुगाव येथील बौद्ध तरुण भालचंद्र कांबळे यांच्यावर जातीयवादी गावगुंडांनी केला जीवघेणा हल्ला
— – – – – – – – – – – – – – – – – – —
शेतात नेवून हात पाय बांधून द्राक्षेच्या बागेतील लोखंडी पोलाला बांधून केली मारहाण
——– – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) येथून जवळच असेलल्या तुगाव ता. उमरगा येथील बौद्ध युवक भालचंद्र कांबळे यास हातपाय बांधून जातीयवादी गावगुंडानी जीवघेणा हल्ला करून केली मारहाण .
याबाबत प्राप्त माहिती अशी की ,तुगाव येथील बौद्ध तरुण भालचंद्र कांबळे हा त्याच्या गावातील समाजमंदीरा समोर त्याच्या मित्रांसमवेत बोलत बसला असता त्याच्याच गावातील मुस्लिम समाजातील त्याचा मित्र चांद अमीर फकीर हा त्यास चल आपण जेवण करण्यासाठी बाहेर जावू म्हणून त्यास जळकोट जवळील एका खानावळीत घेऊन आला. ते दोघेजन जेवण करित असताना काही वेळाने त्याच्या गावातील गावागुंड रोहीत दिपक जोमदे व पंकज शंकर जोमदे हे पण त्या ठिकाणी आले.ते सर्वजन मिळून जेवण केले.त्यानंतर भालचंद्र कांबळे व चांद फकीर हे दोघेजन त्याच्या मोटार सायकल वर गावी तुगावकडे जाण्या करिता निघाले असता रोहीत जोमदे व पंकज जोमदे ह्या दोघानी त्याची मोटार सायकल आष्टामोड येथे आडवली व त्यास त्या दोघानी त्याच्या मोटार सायकल वर भालचंद्र कांबळे याना त्या दोघाच्या मध्ये बसवून बळजबरीने त्यास घेवून जावू लागले त्यावेळेस तो म्हणाला की मला घरी जायचे आहे मला जावू द्या म्हणत असताना देखील शेतात थोडंस काम आहे म्हणून त्यास शेतात घेवून गेले व तो गाडीवरून उतरत असतानाच रोहीत जोमदे यांनी भालचंद्र कांबळेच्या पाटीमागून दोन्ही हात धरून पकडले व महारड्या तुझी लायकी आहे का ? आमच्या समवेत बसायची, तु लय माजला आहेस तुझा आज माज जिरवतो असे म्हणून भालचंद्र याच्या कंबरेत व पाटोत लाता घालू लागला दरम्या भालचंद्र हा खाली पडल्यानंतर पंकज जोमदे हा त्याच्या जवळ असलेल्या चामड्याच्या बेल्टने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यास द्राक्ष बागेतील लोखंडी पोलला भालचंद्र याचे हात पाय बांधून पंकज जोमदे रोहीत जोमदे चांद फकीर व गहिनीनाथ जोमदे या चौघानी काठी बेल्ट लाथा बुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले असता पिढीत बौद्ध तरुण भालचंद कांबळे हा मुरूम पोलीस ठाण्यात गेला असता संबधीत पोलीसांनी त्यास उपचार करण्यासाठी मुरूम येथील शारकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले असून दिनांक १८ मे रोजी दुपारी ४.१० मि . वरील सर्व जातीयवादी गावगुंडावर गुन्हा रं नंबर १३४ / २६ नुसार कलम ११८ (१) ११५ (२) ३५२ ३५१ (२) ३ ( ५) ३ ( १) r ३ ( १) (S) ३ ( २) va नुसार अनुसूचीत जाती आणि अनुसुचीत जमाती आत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या चार अरोपी पैकी चांद अमीर फकीर यास अटक केली असून बाकी ३ मुख्य.अरोपी फरार असल्याचे समजते पुढील. अधिक तपास पोलीस अधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप दहीफळे,पोलीस उपनिरिक्षक राहूल पंतगे,आलूर बिटचे नागनाथ वाघमारे हे पुढील तपास करित आहेत.
सदर प्रकरणी पोलीस तपास हा अत्यंत संत गतीने होत असल्याचे जाणवत असून या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी आंबेडकरी जनतेतून होत आहे.







