मुरुम येथे स्वर्गीय माधवराव पाटील (काका) यांच्या पुण्स्मरनानिमित्त अभिवादन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा-लोहारा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार तथा श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. माधवराव उर्फ काका पाटील,शरण पाटील यांचे (आजोबा) यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त माधवराव पाटील महाविद्यालय येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच मुरुम येथील त्यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.
माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व श्री माधवराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या संख्येने रक्तदान केले आणि स्व. काका पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
स्व. काका पाटील यांनी शिक्षण, कृषी, जलसिंचन आणि सहकार क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळाची स्थापना करून त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचवली. तर सन १९९४ मध्ये शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून सहकार चळवळीला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या परिसराच्या विकासाला मोठी गती मिळाली.
त्यांचा विकासाचा आणि समाजसेवेचा वारसा आदरणीय बसवराज पाटील साहेब व आदरणीय बापूराव काका यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचे कार्य आपण सर्व करत आहोत.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष बापूराव काका पाटील, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, मल्लिनाथ दंडगे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, ॲड. संजय बिराजदार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद शेख, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. महेश होगाडे, डॉ. राम सोलंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









