Best News Portal Development Company In India

औसा येथिल विरनाथ मल्लीनाथ मठ संस्थांन येथे सहस्र जंगम भोजनाचे आयोजन करण्यात आले. उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

औसा येथिल विरनाथ मल्लीनाथ मठ संस्थांन येथे सहस्र जंगम भोजनाचे आयोजन करण्यात आले.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्रीक्षेत्र औसा येथील सद्‌गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने श्री.श्री.श्री. १००८ जगद्‌गुरु डॉ. श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्री.श्री.श्री. १००८ जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाआशीर्वादाने आणि दिव्य सानिध्यात, तसेच श्री. ष. ब्र. डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, श्री. ष. ब्र. शंभुलिंग शिवाचार्य महाराज व सद्‌गुरु श्री. गुरुबाबा महाराज औसेकर पिठाधिपती यांच्या पावन उपस्थितीत सहस्र जंगम भोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याचबरोबर श्री.श्री.श्री. १००८ जगद्‌गुरु डॉ. श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्री.श्री.श्री. १००८ जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची श्री हनुमान मंदिर ते सद्‌गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर महाराज समाधी मंदिर, श्रीक्षेत्र गोपाळपूरपर्यंत भव्य रथोत्सव व ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी शरणजी भैय्या पाटील उपस्थित राहून पूज्य महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यायात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा आनंद घेतला.

दिव्य संत-महंतांच्या आशीर्वादातून समाजसेवेची नवी प्रेरणा, ऊर्जा आणि कार्यशक्ती मिळते, हीच या पवित्र सोहळ्याची खरी अनुभूती ठरली.

यावेळी उमरगा/लोहाराआमदार प्रविण स्वामी गुरुजी,व्यकंटराव गायकवाड, शिरिष आप्पा उटगे,औसा नगर परिषद मा.नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे,औसा पंचायत समिती मा.सदस्य बसवराज धाराशिवे,प्रनिल उटगे,मुरूम नगरसेवक अमर भोसगे,सुजित शेळके अदिंची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india