Best News Portal Development Company In India

गुरूवर्य उज्वलानंद महाराज इच्छापूर्ती निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्यातील श्री दत्त धाम गाणगापूर येथे आयोजन.

गुरूवर्य उज्वलानंद महाराज इच्छापूर्ती निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्यातील श्री दत्त धाम गाणगापूर येथे आयोजन…..

तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.

गुरूवर्य उज्वलानंद महाराज इच्छापूर्ती निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन पुरूषोत्तम अधिक मासाच्या पर्वकाळाचे औचित्य साधून उज्वलानंद महाराज भक्त परिवाराच्या वतीने कर्नाटक राज्यातील श्री दत्त धाम गाणगापूर येथील ओम दत्त चिले, ओम भक्त निवास, संगम रोड येथे रविवार दि. २४ पासून रविवार दि. ३१ मे रोजी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात दररोज काकडा भजन व विष्णू सहस्त्रनाम पहाटे ४ ते ६, गुरूचरित्र पारायण व ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ६ ते १०, हरी किर्तन सकाळी १० ते १२, भोजन दुपारी १२ ते ३, प्रवचन दुपारी ३ ते ५, हरिपाठ सायंकाळी ६ ते ७, हरि किर्तन ७ ते ९ भोजन रात्री ९ ते १०, हरिजागर व संगीत भजन रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत संपन्न होणार आहे. व्यासपीठ सेवा ज्ञानेश्वरी कंठस्थ हभप. हनुमंत महाराज कारेपूरकर, हभप. ज्ञानेश्वर महाराज बरमदे हासोरी यांची होणार आहे.

दररोज सकाळी किर्तन सेवा, दुपारी प्रवचन व संध्याकाळी किर्तन सेवा खालीलप्रमाणे आहेत. रविवार दि. २४ रोजी सकाळी हभप. महेश महाराज माकणीकर यांचे किर्तन दुपारी हभप. तुकाराम भाऊ दत्ताश्रम पुणे व हभप. समाधान महाराज पुणे यांचे प्रवचन तर रात्री हभप. वैभव महाराज खरवळकर पंढरपूर यांचे किर्तन, सोमवार दि. २५ रोजी सकाळी हभप. बाबा महाराज काटगावकर यांचे किर्तन, दुपारी हभप. दादा महाराज सुर्यवंशी बाबळसूर व हभप. आशुतोष महाराज कदमापूर यांचे प्रवचन तर रात्री श्री संत नामदेव महाराजांचे वंशज हभप. माधव महाराज नामदास पंढरपूर, मंगळवार दि. २६ रोजी सकाळी हभप. ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी यांचे किर्तन, दुपारी हभप. ज्ञानदेव गुरूजी हालसी हत्तरगा व हभप. चंद्रकांत महाराज दिक्षित कारूंडे यांचे प्रवचन तर रात्री हभप. विठ्ठल महाराज दिवेगावकर यांचे किर्तन, गुरूवार दि. २८ रोजी सकाळी हभप. दत्ता महाराज अंबिरकर डिकसळ यांचे किर्तन, दुपारी हभप. उल्हास महाराज माने व हभप. महंत तेजसनाथ महाराज कराळी यांचे प्रवचन तर रात्री हभप. संदीपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन, शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज हभप. कान्होबा महाराज देहूकर यांचे किर्तन, दुपारी हभप. दिपक महाराज जाधव अमरबेट व हभप. गोविंद महाराज चित्तमपल्ले यांचे प्रवचन तर रात्री हभप. उमेश महाराज दशरथे आळंदी यांचे किर्तन, शनिवार दि. ३० रोजी सकाळी हभप. गुरूराज महाराज देगलूरकर यांचे किर्तन, दुपारी हभप जनार्दन हेबाडे गुरूजी अचलबेट व हभप. श्री. श्री. १००८ अवधूत पूरी महाराज आष्टा जहांगीर यांचे प्रवचन तर रात्री हभप. श्री संत एकनाथ महाराज वंशज हभप. योगीराज महाराज पैठणकर यांचे किर्तन सेवा संपन्न होणार आहे. रविवार दि. ३१ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ग्रंथदिंडी/ क्षेत्र प्रदक्षिणा तद्नंतर १० ते १२ या वेळेत हभप. भिम महाराज श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान यांचे किर्तन होणार आहे.

या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील श्री. दत्त मंदिर संस्थान मोर्वे येथील सदगुरू ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरे देव यांचा कृपाशीर्वाद राहणार आहे.

गुरूवर्य उज्वलानंद महाराज इच्छापूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन समस्त गुरूवर्य उज्वलानंद महाराज भक्तगण परिवार
यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india